Saturday 22 July 2017

यंदा खरंच कर्तव्य आहे...?



साधारणपणे आपल्याकडे मुलीचं Graduation झालं की, आजूबाजूचे, नातेवाईक मुलीच्या आई-वडिलांना विचारायला सुरवात करतात, “काय मग यंदा कर्तव्य आहे का?” किंवा “काय मग मुलगा बघायला कधी सुरु करताय?” नाहीतर मग स्थळच आणायला सुरवात करतात.

पण एकंदर विचार करता “खरंच! लग्नासाठी मुलीचं किंवा मुलाचं “वय” हा एकच निकष आहे का?” हे खरं आहे की ‘सगळं योग्य वयातच झालं पाहिजे’, आपले घरातले मोठे, जाणती माणसे सुद्धा हे बोलतात त्यात तथ्य आहे.

तरीही मला असं वाटत की फक्त मुलीचं किंवा मुलाचं लग्नाचं वय झालं म्हणून त्यांच्या लग्नासाठी पाठी लागू नये. लग्न म्हणजे आयुष्यभराची commitment असते त्यामुळे तो निर्णय खूप विचार करून घेतला पाहिजे. हा निर्णय घेण्यापूर्वी आपण ‘खरंच लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या निभावू शकतो का?’, ‘तडजोड करू शकतो का?’, ‘आयुष्यात येणारा बदल पूर्णपणे स्वीकारू शकतो का?’, ‘हे नात पूर्णपणे निभावायला आपण तयार आहोत का?’  ‘आपल्या जोडीदाराला समजून घेऊ शकतो का?’, ‘मुलगी असेल तर फक्त जोडीदारालाच नाही तर त्याच्या घरच्यांना समजून घेऊ शकतो का?’ हे आणि असे बरेच प्रश्न  स्वतःला विचारले पाहिजेत. फक्त लग्नाचं वय झालं म्हणून लग्न करण्याचा निर्णय घेऊ नये.

तसं बघयला गेलं तर आजच्या Career Oriented  जगात मुली साधारण २५-२६ नंतर लग्न करतात. काही वेळा Career मुळे लग्नाचा विचार मागे पडतो. काहींना Career ऐन उमेदीच्या काळात लग्नाच्या बंधनात अडकण्याची इच्छा नसते, तरीही मग घरच्यांच्या आग्रहाखातर लग्नाला ‘हो’ म्हणतात. पण ‘हो’ म्हणण्या आधी स्वतःला हे प्रश्न जरूर विचारले पाहिजे आणि तशी मनाची तयारी सुद्धा केली पाहिजे. कारण आज-काल Career मुळे, पैसे कमवण्यामध्ये आपल्या आयुष्यात खूप stress असतो. आणि हा कामाच्या ठिकाणचा stress घरी निघतो आणि मग भांडण आणि बरंच काही. त्यामुळे जर हा stress सांभाळून हे नवीन नात निभावण्याची तुमची मनाची तयारी असेल तरचं म्हणा “हो! यंदा कर्तव्य आहे.”                                         




Tuesday 16 May 2017

टर्निंग पॉईंट


आज १६ मे... आजच्या दिवसाची एक छोटी पण खूप महत्वाची आठवण म्हणजे आज नीना राऊत एंटरटेनमेंट मधील Internship सुरु केलेल्याला १ वर्ष पूर्ण झालं.
MBA चे दुसरे semester संपता संपता Internship कुठे करायची हा प्रश्न होता. Digital Marketing साठी खूप ठिकाणी internship होत्या, online apply सुद्धा केले पण कुठे काही जमेना. मग finally आमच्या कॉलेजच्या सरांच्या ओळखीने एके ठिकाणी Internship मिळाली, ती म्हणजे नीना राऊत एंटरटेनमेंट, अंधेरी येथे. Internship मिळूनही तिथे जायचे कि नाही, हे ठरतं नव्हते. कारण मी कधी घरापासून एकटी लांब राहिले नव्हते, त्यामुळे आई-बाबा मला बाहेर पाठवायला थोडे घाबरतच होते. शेवटी होय-नाही करून मुंबईला जायचे निश्चित झाले. आणि १४ मे रोजी आम्ही म्हणजे आई, बाबा आणि मी मुंबई दिशेने रवाना झालो.

खरंतर मनात खूप भीती होतीच, की या एवढ्या मोठ्या शहरात, नवीन माणसात आपलं कसं होणार?’, पण सार काही खूप छान निभावलं.

एक चांगली गोष्ट अशी होती कि, त्या कंपनीचे प्रमोशनल हेड वैभव शेटकरसर हे आपल्या चिपळूणचेच होते. आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे ते खूपच helpful, supportive होते. ते सर्व काही अगदी व्यवस्थित समजावून सांगत असतं. त्याचबरोबर तिथे असलेला भुषण कदम, त्याच्या कडून सुद्धा खूप काही शिकता आले. अगदी सगळं काम जे तिथे चालायचं ते सगळं काही शिकता आलं आणि करायला सुद्धा मिळालं. खरंच या कंपनी मधील कामाच्या अनुभवातून खूप काही शिकता आलं, जे Classroom मध्ये आलं शिकता नसतं.   
खरतरं अशी समज असते कि मोठ्या कंपनी मध्ये Internship मिळाली कि project चांगला होतो, पुढे job च्या दृष्टीने चांगल असतं. तस खरं ही असेल म्हणा ते. पण हे सुद्धा तितकाच खरं आहे कि छोट्या कंपनी मध्ये Internship केली कि खूप काही शिकता येत, तिथे खर काम करता येत.  
ही Internship माझ्या साठी टर्निंग पॉईंट ठरली, कारण वैभव सरांनी मला job ची ऑफर दिली, आणि क्षणाचाहि विलंब न करता मी ती स्वीकारली. Work From Home असा या job चा प्रकार होता, त्यामुळे मी माझं MBA च शिक्षण घेता-घेता Part-Time मी हा job करू शकले. आणि १२ जुलै पासून learning +earning चा प्रवास सुरु झाला. जुलै ते नोव्हेंबर मी नीना राऊत एंटरटेनमेंट मध्ये, काम केले. आणि पुढे काही दिवस परीक्षेमुळे कामाला सुट्टी घेतली.   

 डिसेंबर, माझा तिसऱ्या semester चा शेवटचा पेपर देऊन मी नुकतीच घरी आलेले तेवढ्यात अचानक वैभव सरांचा फोन आला, आणि म्हणाले कि एक news आहे ती अशी कि, मी ‘नीना राऊत एंटरटेनमेंट’ कंपनी सोडतोय…” क्षणभर मला काही कळलच नाही. पुढे ते म्हणाले कि, “मी नवीन कंपनी सुरु करतोय, तर तिथे तुला काम करण्याची इच्छा आहे का?.तेव्हा मी लगेच 'हो' म्हणाले आणि दुसऱ्या दिवशी पासून कामाला लागले. आज मी “Page Roles” या कंपनीमध्ये Social Media Executive म्हणून काम करते आणि ते सुद्धा घरी बसून....

                 म्हणूनच हि internship माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली.  




Saturday 6 May 2017

...स्मृती ठेवून जाती

चला.... College Life संपली....आता जबाबदारीच्या जगात जायची वेळ आली.....

आयुष्यातल्या खुप सुंदर अशा पर्वाचा मी निरोप घेतला. निरोप घेण ही एक नाजूक आणि हृदयस्पर्शी अवस्था आहे. सुख आणि दुःख यांच्यातल्या सीमारेषेवरची ही अवस्था प्रत्येक व्यक्तीच्या वाटल्या कोणत्या ना कोणत्या तरी संदर्भात अटळपणे सामोरी येते. म्हणूनच या क्षणी हा निरोप घेताना मनात खुप संमिश्र अशा भावना आहेत. मनाची चलबिचल चालू आहे. जवळच्या व्यक्ति आता नेहेमी भेटनार नाहीत याच दुःख ही आहे, तसेच आता नविन पर्वाला सुरवात होणार, नविन माणसं, नविन आव्हानं या बाबत उत्सुकता देखील आहे. नविन शिकायला मिळणार याचा आनंद देखील आहे.

खरी College Life मी अनुभवली ती म्हणजे B.Sc. IT च्या त्या तीन वर्षाच्या प्रवासात. खर तर त्या तीन वर्षांविषयी कमी शब्दात मांडण तस कठीणच आहे.  ती तीन वर्ष म्हणजे माझ्या आयुष्यातली खूप सुंदर तीन वर्ष होती. अभ्यासाची तर जबाबदारी होतीच; पण आयुष्य उपभोगणे म्हणजे काय, याचा अर्थ कळू लागला होता. खर तर तो सुंदर स्वप्न बघण्याचा काळ होता. ती तीन वर्षे हसत खेळत सुंदर स्वप्ने बघण्यात पार पडली. मैत्रीचे घट्ट धरलेले हात कधीच सोडायचे नाहीत, असे ठरलेले असताना पुढच्या वाटा अचानक वेगळ्या झाल्या. पण आजही त्या जुन्या आठवणी मनात ताज्या आहेत; रविना, अंतरा, अमृता, भूपाली, अपर्णा, दिबा, राहुल, अजिंक्य, सागर यांच्या बरोबर केलेली मज्जा, एकमेकांची टिंगल, त्या रंगलेल्या गप्पांच्या मैफिली; राहुल, अजिंक्य आणि सागर यांनी मला दिलेला त्रास आणि बराच काही.... या सगळ्या गोड आठवणी आठवल्या कि अलगद चेहेर्यावर हसू येत. प्रेमासह तारुण्याच्या सर्व व्याख्या जाणून घेत झालेला हा प्रवास संपवून आम्ही सर्व पुढच्या प्रवासाला निघालो.        
           
पुढे मी MBA ला admission घेतल. आजही मला तो admission चा दिवस आठवतोय. खरंतर मनात नसताना मी MBA ला admission घेतल आणि सुरु झाला हा २ वर्षाचा प्रवास. या दोन वर्षात खुप चांगले वाईट अनुभव आले. नविन गोष्टी शिकता आल्या. खरं तर म्हणव तस मनासारखं काही घडल नाही या २ वर्षात. पण ३ व्यक्ति अशा आहेत ज्यांना मी कधीच विसरणार नाही. खरंतर या तीन व्यक्तींमुळे माझा MBA चा प्रवास खुप छान झाला...

त्यातली पहिली महत्वाची व्यक्ति म्हणजे "हिमा"
माझी खुप जवळची मैत्रीण, जिच्याशी मी मनातल सर्व काही बोलू शकते. खुप हुशार, समजूदार, प्रेमळ, समजून घेणारी, समजावून सांगणारी अशी हि मैत्रीण. हिमा माझ्यापेक्षा मोठी असल्याने ती कधी मला मोठ्या बहिणीच्या अधिकाराने रागवायची तर कधी समजावून सांगायची.  तिच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. आमच्या गप्पा म्हणजे कधीही न संपणाऱ्या. खरंच हिमा खूपच miss करीन मी तुला.      


दूसरी व्यक्ति म्हणजे "मरियम मॅम"
Classroom मधे teacher असलेल्या मरियम मॅम सुद्धा मला एका मैत्रिणी सारख्याच वाटतात. खुप साध्या, सरळ, कायम हसमुख असणाऱ्या आमच्या या मैडम ज्यांच्याशी आम्ही एक मैत्रीप्रमाणेच सर्व काही share करत असे. हिमा आणि मॅम बरोबरच gossiping म्हणजे तर खुपच मज्जा....

तीसरी महत्वाची व्यक्ति म्हणजे "श्रीनिवास गोखले सर"
त्यांच्या विषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच. त्यांच्या प्रत्येक lecture नंतर अस वाटायच की "बापरे!किती knowledge आहे सरांना, आम्हाला तर यातल 2% पण knowledge नाही". खरंच, जेव्हा सर join झाले तेव्हा अस अजिबात वाटल नव्हतं की सरांबरोबर एवढं चांगल पटेल. खुप strict असे दिसणारे पण खुप चांगले असणारे हे सर. सरांना कोणताही प्रश्न विचारा त्यावर सरांकडे उत्तर नाही असं कधीच झालं नाही.रंतर खुप त्रास दिला मी त्यांना, पण तरीही कायम मार्गदर्शन केलं. कधीही काही problem आला तरी कायम मार्ग दाखवणारे, समजावून सांगणारे असे हे सर.

खरचं खुप मनापासून धन्यवाद तुम्हा तिघांना....

तसंही आपली इच्छा असो वा नसो आयुष्य आपल्याला वेगवेगळ्या वळणांवर आणून उभे करतो. आपण कधी विचारही केलेला नसतो, अशा ठिकाणी आपण जाऊन पोहोचतो. त्या त्या ठिकाणी स्वतःला रमवणे आणि आनंदी राहणे एवढच आपल्या हातात असत.
या कॉलेजच्या विश्वानंतर आता नोकरी, व्यवसाय, उच्चशिक्षण अशा अनेक कारणांनी नविन शहरात जाणे होईल, नविन माणसं भेटतील, पण तिथेही कधीतरी निरोपाची वेळ येईलच. कारण आयुष्यात पुढे जाताना काही मागे टाकले जाणारच. निरोप घेऊन माणसे दूर जातात, दृष्टीआड होतात पण त्यांच्या आठवणी मात्र मनातून जात नाहीत.

म्हणूनच म्हणावस वाटत “खरचं! गेले ते दिवस राहिल्या त्या फ़क्त आठवणी....