Sunday 14 October 2018

Don't Worry Be Happy

Don't Worry Be Happy


आज Finally... आचार्य अत्रे, कल्याण येथे Don't Worry Be Happy नाटकाचा प्रयोग पाहण्याचा योग आला... खरं तर गेली २ वर्षे या नाटकाच्या social media प्रसिद्धी टीम मध्ये असल्याने मी सुद्धा या नाटकाचा छोटा भाग होते... आणि आज नाटक पाहिल्यावर खरंच मी अभिमानाने सांगते 'मी हि या नाटकाचा भाग आहे'.
या नाटकाचे लेखन मिहीर राजदा यांनी तर दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केले आहे. उमेश कामत(अक्षय प्रधान) आणि स्वानंदी टिकेकर(प्रणोती प्रधान) हे प्रमुख भूमिकेत तर आशुतोष गोखले(चिंतन) हे सह कलाकार आहेत.
या नाटकाचा विषय खूपच महत्वाचा आहे आणि खूपच छान पद्धतीने तो प्रेक्षकांसमोर मांडला जात आहे. आज कालची कामाची पद्धत, कामामुळे येणारा stress आणि अशा stress मुळे होणारे त्रास. फक्त stress च नाही तर PCOD (Polycystic Ovarian Syndrome) या आजारा सारखा अतिशय महत्वाचा विषय खूपच छान आणि काहीशा हलक्या फुलक्या पद्धतीने या नाटकात मांडला गेला आहे. हा विषय काहीशा गंभीर आहे हल्ली या आजाराचे प्रमाण वाढतं चालले आहे. सुरवातीला साधी साधी लक्षणे वाटणारा हा आजार पुढे जाऊन किती मोठा होऊ शकतो हे हि या मध्ये दाखवलं आहे. त्याचंबरोबर आज काल target च्या मागे लागलेल्या नवरा-बायकोचं (अक्षय-प्रणोती) नातं, या PCOD आजारामुळे त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, त्यांच्या मध्ये होणारे वाद, तरीही एकमेकांची काळजी खूप छान पद्धतीने दाखवले आहे. या दोघांबरोबरच महत्वाची भूमिका आहे ती त्या दोघांच्या एका मित्राची, चिंतनची. मित्राच्या वाईट काळात त्याला साथ देणाऱ्या या मित्रांची भूमिकाही खूप आवडली. त्याचंबरोबर आई-वडिलांपासून वेगळे बायको बरोबर राहणाऱ्या नवऱ्याच्या मनाची अवस्था, 'आज आपण आई-वडिलांचं ऐकलं असतं तर खूप बरं झालं असतं, ही त्यांना वाटणारी खंत, त्या दोघंमधील वाद, त्यामुळे झालेलं separation, त्यानंतर divorce चा निर्णय, divorce celebrate करण्याची भन्नाट कल्पना, दोघांचं परत एकत्र येणं आणि शेवटचा एक खूप महत्वाचा निर्णय, खरंच या सगळ्यांमधून आजच्या पिढीला खूप शिकण्यासारखं आहे.
खरंच विषय गंभीर असूनही त्यांच्या संवादातून निर्माण होणाऱ्या विनोदांमुळे वातावरण हलकं फुलकं राहतं.
या तिघांच्याही अभिनया विषयी काय बोलावं.. खरंच..!!! लाजवाब..!!!! 'उमेश कामत' यांना समोर स्टेजवर, Live काम करताना बघणं म्हणजे रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणीच. या आधी या नाटकामध्ये' स्पृहा जोशी' होत्या, पण काही कारणांमुळे त्यांना 'स्वानंदी टिकेकर' यांनी Replace केले. जेव्हा स्पृहा यांनी नाटक सोडणार हे Facebook Live द्वारे सांगितले तेव्हा त्या बोलल्या होत्या कि 'तेवढ्याच ताकतीची अभिनेत्री हा रोल करणार आहे' आणि खरंच!!! स्वानंदी टिकेकर यांनी हि भूमिका खूप मस्त साकारली आहे, खूपच सुंदर अभिनय. आणि आशुतोष गोखले यांनी मित्राची भूमिका खूप छान वटवली आहे.
या नाटकाने ३०० प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. या पुढे या नाटकाचे असंख्य प्रयोग व्हावे आणि हा विषय सर्वांपर्यंत पोहोचावा हीच सदिच्छा.
सर्व रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती हे नाटक नक्की नक्की बघा. आणि हो.. Don't Worry Be Happy....