Sunday, 14 October 2018

Don't Worry Be Happy

Don't Worry Be Happy


आज Finally... आचार्य अत्रे, कल्याण येथे Don't Worry Be Happy नाटकाचा प्रयोग पाहण्याचा योग आला... खरं तर गेली २ वर्षे या नाटकाच्या social media प्रसिद्धी टीम मध्ये असल्याने मी सुद्धा या नाटकाचा छोटा भाग होते... आणि आज नाटक पाहिल्यावर खरंच मी अभिमानाने सांगते 'मी हि या नाटकाचा भाग आहे'.
या नाटकाचे लेखन मिहीर राजदा यांनी तर दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केले आहे. उमेश कामत(अक्षय प्रधान) आणि स्वानंदी टिकेकर(प्रणोती प्रधान) हे प्रमुख भूमिकेत तर आशुतोष गोखले(चिंतन) हे सह कलाकार आहेत.
या नाटकाचा विषय खूपच महत्वाचा आहे आणि खूपच छान पद्धतीने तो प्रेक्षकांसमोर मांडला जात आहे. आज कालची कामाची पद्धत, कामामुळे येणारा stress आणि अशा stress मुळे होणारे त्रास. फक्त stress च नाही तर PCOD (Polycystic Ovarian Syndrome) या आजारा सारखा अतिशय महत्वाचा विषय खूपच छान आणि काहीशा हलक्या फुलक्या पद्धतीने या नाटकात मांडला गेला आहे. हा विषय काहीशा गंभीर आहे हल्ली या आजाराचे प्रमाण वाढतं चालले आहे. सुरवातीला साधी साधी लक्षणे वाटणारा हा आजार पुढे जाऊन किती मोठा होऊ शकतो हे हि या मध्ये दाखवलं आहे. त्याचंबरोबर आज काल target च्या मागे लागलेल्या नवरा-बायकोचं (अक्षय-प्रणोती) नातं, या PCOD आजारामुळे त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, त्यांच्या मध्ये होणारे वाद, तरीही एकमेकांची काळजी खूप छान पद्धतीने दाखवले आहे. या दोघांबरोबरच महत्वाची भूमिका आहे ती त्या दोघांच्या एका मित्राची, चिंतनची. मित्राच्या वाईट काळात त्याला साथ देणाऱ्या या मित्रांची भूमिकाही खूप आवडली. त्याचंबरोबर आई-वडिलांपासून वेगळे बायको बरोबर राहणाऱ्या नवऱ्याच्या मनाची अवस्था, 'आज आपण आई-वडिलांचं ऐकलं असतं तर खूप बरं झालं असतं, ही त्यांना वाटणारी खंत, त्या दोघंमधील वाद, त्यामुळे झालेलं separation, त्यानंतर divorce चा निर्णय, divorce celebrate करण्याची भन्नाट कल्पना, दोघांचं परत एकत्र येणं आणि शेवटचा एक खूप महत्वाचा निर्णय, खरंच या सगळ्यांमधून आजच्या पिढीला खूप शिकण्यासारखं आहे.
खरंच विषय गंभीर असूनही त्यांच्या संवादातून निर्माण होणाऱ्या विनोदांमुळे वातावरण हलकं फुलकं राहतं.
या तिघांच्याही अभिनया विषयी काय बोलावं.. खरंच..!!! लाजवाब..!!!! 'उमेश कामत' यांना समोर स्टेजवर, Live काम करताना बघणं म्हणजे रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणीच. या आधी या नाटकामध्ये' स्पृहा जोशी' होत्या, पण काही कारणांमुळे त्यांना 'स्वानंदी टिकेकर' यांनी Replace केले. जेव्हा स्पृहा यांनी नाटक सोडणार हे Facebook Live द्वारे सांगितले तेव्हा त्या बोलल्या होत्या कि 'तेवढ्याच ताकतीची अभिनेत्री हा रोल करणार आहे' आणि खरंच!!! स्वानंदी टिकेकर यांनी हि भूमिका खूप मस्त साकारली आहे, खूपच सुंदर अभिनय. आणि आशुतोष गोखले यांनी मित्राची भूमिका खूप छान वटवली आहे.
या नाटकाने ३०० प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. या पुढे या नाटकाचे असंख्य प्रयोग व्हावे आणि हा विषय सर्वांपर्यंत पोहोचावा हीच सदिच्छा.
सर्व रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती हे नाटक नक्की नक्की बघा. आणि हो.. Don't Worry Be Happy....

Monday, 4 June 2018

'संगीत देवबाभळी'
एक विठुसावळी नाट्यकृती....




आज सावित्रीबाई फुले कलामंदिर, डोंबिवली येथे 'संगीत देवबाभळी' हि नाट्यकृती अनुभवली.
हो! नाट्यकृती पहिली नाही तर अनुभवली...


या नाटकाच्या Social Media प्रसिद्धी टीम मध्ये असल्याने सुरवातीपासूनच मी सुद्धा या नाटकाचा एक भाग आहे, त्यामुळे या नाटकाविषयी खूप ऐकलं होते, वाचले होते पण पाहण्याचा योग येत नव्हता. पण आज प्रेक्षक म्हणून या नाटकाचा भाग होता आलं.
आणि आज जवळ जवळ १२ वर्षानंतर नाटक फक्त पाहायला नाही तर अनुभवायला मिळालं.

या दोन अंकी नाटकात फक्त दोनच पात्रे आहेत - संत तुकारामांची बायको 'आवली' आणि 'लखुबाई' उर्फ 'रखुमाई'. शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी यांनी या भूमिका खूप सुंदररित्या साकारल्या आहेत. दोघीनींही खूप सुंदर अभिनय केला आहे आणि खूप गोड आवाज आहे दोघींचाहि. त्या दोघी Live गाणं गात आहेत असं वाटतचं नाही. असं वाटतं की recorded आहे.
तसेच, सुरवातीला कजाग वाटणारी आवली, नाटकाच्या शेवटाकडे येताना, ती तिच्या जागी बरोबरही वाटते.
रखुमाईच्या मनाची अवस्था पाहून वाटले की नशिबाचे भोग देवालाही चुकले नाही.

तसे संपूर्ण नाटकांचे प्रकाश आणि ध्वनी संयोजन खूप अप्रतिम आहे; तरी इंद्रायणी काठ दाखविण्यासाठी केलेली रचना, पावसाळी वातावरण दाखविणारा निळा गर्द प्रकाश आणि ध्वनी संयोजन मला खूप भावले.

हे नाटक लिहिणारे आणि दिग्दर्शित करणारे 'प्राजक्त देशमुख' यांनी शब्दांची सुंदर किमया या नाटकात साधली आहे. संगीत नाटकं असलं तरी काही संवादातून निर्माण होणाऱ्या विनोदांमुळे (खरं विनोद असं नाही म्हणता येणार) वातावरण हलकं फुलकं राहत.

अजून एक विशेष बाब म्हणजे या संगीत नाटकाला तरुण वर्ग सुद्धा मोठया संख्येने उपस्थिती लावतं आहे.

खरंच!!! हा एक नाट्यानुभव आहे... खरं या नाटकाविषयी खूप लिहायचं होत पण शब्द सुचतं नाही आहेत.... 
तुम्ही सुद्धा हि 'भद्रकाली प्रॉडक्शन' ची ५५वी विठूसावळी नाट्यकृती 'संगीत देवबाभळी' नक्की अनुभवा...

Sunday, 13 May 2018

आम्ही दोघी 




आज मातृदिनानिमित्त सगळेच भरभरून बोलत आहेत... Facebook आणि Whats App वर सकाळ पासून Mothers Day च्या Posts, Messages  येत आहेत... मग म्हटलं आपणही थोडं लिहावं, माझ्या आणि माझ्या आईच्या नात्याविषयी... 
खरं कुठून सुरु करू कळत नाहीय... 

इतर माय-लेकींसारखाच आमचं ही गोड असं मैत्रीचं नातं आहे.... संध्याकाळचं चालायला जाण असो, बाजारात जाण असो, वा कोणत्या कार्यक्रमाला जाण असो आम्ही दोघी एकत्र असतोच... इतर लोकांनाही आम्हाला कायम एकत्र बघायची इतकी सवय झाली आहे कि, कधी आमच्या पैकी कोणी एकटं दिसलं की हमखास सगळी विचारणार 'अरे! आज एकटीच?'  आमच्या इथले काका आम्हाला म्हणतात 'अशी माय-लेकीची जोडी कायम एकत्र फिरणारी मी कधी पहिली नव्हती... झक्कास!!!'  😃

आम्ही 'माय-लेकी' पेक्षा 'बहिणी-बहिणी' जास्त वाटतो असं खूप जण बोलतात.  आता  आई ला,  ती लहान वाटते अशी  compliment असते की मी मोठी वाटते, हा गमतीचा भाग आहे... 😜

 तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण मला माझी आई अजूनही भरवते...😇 आणि मला ते खूप आवडतं.. Obviously, प्रत्येकाला आपल्या आईने भरवलेला आवडत असेलचं ... आधी शाळा, कॉलेज मध्ये असताना अभ्यास जास्त असला, मला जेवायला वेळ नसला कि आई भरवायची आणि आता माझा जॉब ऑनलाईन असल्यामुळे मी तो घरातूनच करते त्यामुळे कधी काम जास्त असलं  कि भरवते आणि कधी कधी मी तिच्यावर  रागावले कि हि भरवते... खरंच खूप भारी वाटतं जेव्हा आई भरवते... 
                    
कधी आई माझ्यावर रागावली, मला ओरडायला लागली की मी तिच्या कडे  बघते आणि मोठ्ठी Smile देऊन तिला मिठी मारते... मग काय तिचा राग जातो पळून...😅
आई कडे कधी काम असलं, तिला मस्का मारायचा असला, किंवा कधी माझ्या मनातील जाणून माझ्या साठी काही Special Dish केली असेल की मी तिला मिठी मारून म्हणते,

'तू कितनी अच्छी है,  तू कितनी प्यारी है....
प्यारी प्यारी है....
ओ माँ !!!  ओ माँ !!!