Saturday 5 September 2020

Sukh Mhanje Nakki Kay Asat

 सुख म्हणजे नक्की काय असतं !

Birthday Cake

'सुख' म्हणजे तेच जेव्हा आपली माणसं आपल्यासाठी काही तरी मनापासून करतं असतात.
काल माझा जन्मदिवस होता आणि माझ्या माणसांनी तो खूप सुंदर साजरा केला. Surprise Birthday Celebration Plan केलं होत सगळ्या भावंडांनी.
माझ्या बहिणींनी खूप सुंदर केक केला, भावांनी आणि मामाने Decoration केलं, तर आई आणि वहिनीने स्वादिष्ट पदार्थ केले, आणि बाबांनी माझ्या आवडीचे गुलाबजाम आणले.
हे सगळं planning केलेलं माझ्या वहिनीने. वाढदिवसाच्या २ दिवस आधीपासून माझ्या नकळत तीचं Birthday planning सुरु झालं. सगळ्यांना मेसेज करून कल्पना दिली कोणी कसं काय करायचं हे ठरवलं. आणि वाढदिवसाच्या दिवशी संध्याकाळी मी देवळात आणि इतर काही कामांसाठी माझ्या बहिणीसोबत बाहेर गेले तेव्हा सगळ्यांना घरी बोलावून पटापट सगळी तयारी केली. आणि घरी येताच हे सुंदर Surprise मिळालं. तेव्हाच्या भावना खरं तर शब्दात व्यक्त नाही करता येत आहेत. पण आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी प्रेमाने केलंय हीच भावना खूप सुखावणारी आहे.

खरंच..! बाहेर हॉटेल मध्ये जाऊन वाढदिवस साजरा करण्यापेक्षा, बाहेर कोणाला ऑर्डर देण्यापेक्षा जेव्हा आपण आपल्या माणसासाठी, त्याच्या आवडीचा विचार करून काहीतरी करतो ना तेच खरं Celebration. जरी ते Professional Decorator एवढं perfect नसलं तरी आपल्या माणसांनी प्रेमाने केल्यामुळे खूप सुंदर असतं, त्यात प्रेम असतं. आणि हे सगळं Planning करताना, Decoration करताना जी धमाल येते ना ते काही औरच...
हे करूया, असं करूया, तिला हे आवडेल, असं केलं तर ती जास्त खुश होईल, हा फुगा इथे असा लावूया, केकची design अशी करूया, हे कारण काढून तिला बाहेर पाठवूया, मग इकडे घरी तयारी होई घराबाहेर कसं गुंतवून ठेवता येईल हे जे काही discussion होत ना त्याची मजा काही औरच...

खरंच ते म्हणतात ना तुम्ही समोरच्याला जेवढा जीव लावाल समोरचासुद्धा तुमच्यावर तेवढंच प्रेम करेल...
अशी प्रेम करणारी माणसं आयुष्यात असल्यावर आणि काय हवं! 😇