Sunday, 20 October 2019

एक लढवय्या 

                   
आत्ताच अभिनेते ' शरद माधव पोंक्षे ' यांची ABP Majha वरील 'माझा कट्टा' या कार्यक्रमातील त्यांची मुलाखत पहिली.
काय बोलावं या माणसा विषयी प्रचंड सकारात्मक ऊर्जा, स्पष्टवक्तेपणा अहा..!!!
एवढ्या मोठ्या आजारावर मात करून हा माणूस परत त्याच ताकतीने उभा राहिला आहे, रंगभूमीची सेवा करायला.
सलाम..!!🙏👏🙌
खरं तर या आधी 'शरद पोंक्षे' म्हणजे मराठी मधील एक अभिनेते एवढंच माझ्या मनात त्यांच्या विषयीच मत. आणि काही लोकांकडून, मीडिया मधून फक्त ऐकलेलं कि ते गांधी विरोधी आहेत, गांधीजींना शिव्या घालतात आणि असंच काही. तेव्हा मला वाटायचं की का एवढा गांधीजींचा राग? गांधीजींनी काहीतरी चांगलं केलं असेल म्हणून लाखो लोक त्यांच्या मागे होते, परदेशात सुद्धा त्यांच्या विषयी चांगला बोलला जात, मग हे का असे बोलत असावेत.
पण, खरंच शरदजीं विषयी जो गैरसमज होता ना तो आज दूर झाला. ते 'सावरकरवादी' आहेत, 'नथुराम गोडसे' यांची त्यांनी भूमिका केली म्हणजे ते गांधी विरोधी असतीलच असं नाही. हे मीडियावाले, आणि स्वतःचा फायदा बघणारे राजकारणी काही वेळा आपल्या सामोर असं चित्र उभं करतात की आपण तेच बघत राहतो. 😢
खरंच एखाद्याच ऐकून कोणाविषयी आपलं मत बनवू नये, हे आज कळलं. एखाद्याचं नक्कीच ऐका, पण त्या माणसाविषयी आपलं मत लगेच तसं मत बनवू नका.
थांबा, जरा विचार करा आणि मगच आपल मत बनवा. कारण प्रत्येकाला आलेला अनुभव हा वेगळा असू शकतो, तो माणूस कदाचित त्यावेळी परिस्थितीनुसार तसा वागला असेल म्हणजे तो तसाच असेल असं नाही. त्यामुळे कोणाविषयी हि लगेच आपलं मत बनवू नका.
बाकी आपण सुज्ञ आहोतच...!!!🙏
आणि हा नक्की बघा हि मुलखात, खूप प्रेरणा मिळेल.
त्यांनी त्यांच्या आजाराशी केलेला सामना, काही मजेदार किस्से, थोडं त्यांच्या अभिनयाविषयी, गांधी विचारांविषयी, त्यांच्या गोडसे भूमिकेविषयी हि ऐकायला मिळेल आणि हि ५१ मिनिट चांगल्या ठिकाणी खर्च केल्याचं समाधान हि मिळेल . 😊
सर तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.. 🙏
Thank You So much Prathamesh Bobhate for sharing this link...😊 🙏

कॅन्सरवर मात करुन रंगभूमीवर पुनरागमन, अभिनेते शरद पोंक्षेंसोबत गप्पा | माझा कट्टा>>

Friday, 20 September 2019

जतन कशाचे करावे..?

जतन कशाचे करावे..? 


आजच माझ्या वाचनात आलं कि, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांनी गुजरात येथील वडनगर स्टेशन वर जिथे लहानपणी चहा विकला ती जागा म्हणे 'पर्यटन स्थळ' करणार आहेत. त्या Tea stall च जतन करणार आहेत म्हणे.  ठीक आहे करा जतन, ज्यामुळे चहा वाला पंतप्रधान झाला(झाले), गरिबीतून वर आले, चांगली गोष्ट आहे.

पण मग आमच्या महाराजांच्या गड-किल्यांचं काय..?
हजारो मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेले गड-किल्ले जतन करायला हवेत कि त्यांचे Heritage hotel मध्ये रूपांतर व्हायला हवं..?

जर मोदींनी जिथे 'फक्त चहा विकला' जी जागा मूळ स्वरूपात जतन केली जात आहे, वडनगर स्टेशन आणि आजूबाजूचा काही परिसर काही कोटी रुपये खर्च करून पर्यटन स्थळ केले जात असताना मात्र तो Tea stall आहे त्या स्थितीत जतन केला जाणार आहे...
तर मग महाराजांच्या साथीने हजारो मावळ्यांनी प्राणाची पर्वा ना करता स्वराज्यात आणलेले गड-किल्ले, आहे त्या स्थितीत जतन केले जाऊ शकत नाहीत..?
त्यासाठी त्यांना Heritage hotel चा दर्जा देणं खरंच गरजेचं आहे...?
       
संदर्भ:

https://www.youtube.com/watch?v=RfTA6NIFKq0

https://www.ndtv.com/india-news/in-gujarat-stall-where-pm-modi-once-sold-tea-to-be-made-tourist-spot-2094580

https://www.indiatoday.in/lifestyle/travel/story/pm-narendra-modi-sold-tea-at-this-vadnagar-stall-in-gujarat-now-it-will-be-a-tourist-spot-1594623-2019-09-02

Thursday, 15 August 2019


स्वातंत्र्यातील  बंधन 

या वर्षीचा एक सुंदर योगायोग म्हणजे,  एकीकडे देशाचा स्वतंत्र दिन साजरा करायचा आहे तर एकीकडे गोड असं बंधन आहे 'रक्षाबंधन'... 

'रक्षाबंधन' म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून भाऊ आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो. किंवा आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे.


पण आताच्या काळात मुलींना आता फक्त समाजात वावरतानाच नाही तर Social Media वर सुद्धा सुरक्षिततेची, रक्षणाची गरज भासू लागली आहे. त्याच कारण असं, कि हल्ली Social Media वरून मुलींचे फोटो घेऊन ते अश्लील मेसेज सह किंवा खूप वाईट पद्धतीने Edit करून Viral केले जात आहेत. तिला बदनाम केलं जातं आहे. आणि हो, हे Viral होणारे फोटो कमी कपड्यातले असतातच असं नाही हा. काय आहे ना हल्ली मुलींच्या कपड्यांवरून खूप चर्चा केली जाते ना.. Viral होणारे बरेच फोटो हे पूर्ण कपड्यातले, साडी मधले, simple असेही असतात.  म्हणजे इथे प्रश्न फक्त मुलींच्या कपड्यांचा नाही तर तो बघणार्यांच्या दृष्टिकोनाचा, त्या विकृतीचा आहे.   

पण, काही झालं तरी बंधनं मुलींवरच येतात. मुलींनी असं वागू नये, तसं करू नये. Social Media हे टाकू नको, स्वतःचा फोटो नको टाकू. म्हणजे मुलींनी कायम बंधनातच राहायचं का? मग ते समाजात असो किंवा Social Media वर. या मध्ये मुलींची काय चूक? की ती मुलगी आहे ही तिची चूक? 
या Cyber Crime मध्ये जर कोणाची चूक असेल तर ती त्या वृत्तीची आहे. आणि महत्वाचे म्हणजे हि विकृती फक्त मुलांमध्येच आहे असं नाही; तर काही वेळा असं करणारी एक मुलगीही असू शकते हे खूप दुर्दैवी आहे.  

असे गुन्हे पकडले जातात, जेल पण होते, मग जामीन होते आणि पुढे केस चालूच राहते. Social Media वर सुद्धा काही Security Features आहेत तरीही असे गुन्हे घडतात आणि घडत राहतील. मग मुलींनी करायचे काय? 

त्यामुळे समाजात वावरताना कदाचित तुम्ही एका मुलीचं रक्षण करालही पण Social Mediaचं काय? 

अशा वेळी तिला रक्षणाची नाही तर तुमच्या पाठिंब्याची गरज असते. तिच्यावर बंधन घालण्यापेक्षा तिला फक्त म्हणा, 'तुझी काही चूक नाही, आम्ही आहोत तुझ्या बरोबर'.     

मी असं म्हणतं नाही कि प्रत्येक वेळी मुली १००% बरोबर आहेत, काही ठिकाणी त्यांची हि चूक असू शकेल. पण तिची अशी बदमानी नको.  

या स्वातंत्र्यामध्ये तिच्यावरचं बंधनं नको.  तर या वाईट वृत्तीवर, या विकृतीवर बंधन येवो हीच प्रार्थना...  

जय हिंद!!! 


Sunday, 14 October 2018

Don't Worry Be Happy

Don't Worry Be Happy


आज Finally... आचार्य अत्रे, कल्याण येथे Don't Worry Be Happy नाटकाचा प्रयोग पाहण्याचा योग आला... खरं तर गेली २ वर्षे या नाटकाच्या social media प्रसिद्धी टीम मध्ये असल्याने मी सुद्धा या नाटकाचा छोटा भाग होते... आणि आज नाटक पाहिल्यावर खरंच मी अभिमानाने सांगते 'मी हि या नाटकाचा भाग आहे'.
या नाटकाचे लेखन मिहीर राजदा यांनी तर दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केले आहे. उमेश कामत(अक्षय प्रधान) आणि स्वानंदी टिकेकर(प्रणोती प्रधान) हे प्रमुख भूमिकेत तर आशुतोष गोखले(चिंतन) हे सह कलाकार आहेत.
या नाटकाचा विषय खूपच महत्वाचा आहे आणि खूपच छान पद्धतीने तो प्रेक्षकांसमोर मांडला जात आहे. आज कालची कामाची पद्धत, कामामुळे येणारा stress आणि अशा stress मुळे होणारे त्रास. फक्त stress च नाही तर PCOD (Polycystic Ovarian Syndrome) या आजारा सारखा अतिशय महत्वाचा विषय खूपच छान आणि काहीशा हलक्या फुलक्या पद्धतीने या नाटकात मांडला गेला आहे. हा विषय काहीशा गंभीर आहे हल्ली या आजाराचे प्रमाण वाढतं चालले आहे. सुरवातीला साधी साधी लक्षणे वाटणारा हा आजार पुढे जाऊन किती मोठा होऊ शकतो हे हि या मध्ये दाखवलं आहे. त्याचंबरोबर आज काल target च्या मागे लागलेल्या नवरा-बायकोचं (अक्षय-प्रणोती) नातं, या PCOD आजारामुळे त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, त्यांच्या मध्ये होणारे वाद, तरीही एकमेकांची काळजी खूप छान पद्धतीने दाखवले आहे. या दोघांबरोबरच महत्वाची भूमिका आहे ती त्या दोघांच्या एका मित्राची, चिंतनची. मित्राच्या वाईट काळात त्याला साथ देणाऱ्या या मित्रांची भूमिकाही खूप आवडली. त्याचंबरोबर आई-वडिलांपासून वेगळे बायको बरोबर राहणाऱ्या नवऱ्याच्या मनाची अवस्था, 'आज आपण आई-वडिलांचं ऐकलं असतं तर खूप बरं झालं असतं, ही त्यांना वाटणारी खंत, त्या दोघंमधील वाद, त्यामुळे झालेलं separation, त्यानंतर divorce चा निर्णय, divorce celebrate करण्याची भन्नाट कल्पना, दोघांचं परत एकत्र येणं आणि शेवटचा एक खूप महत्वाचा निर्णय, खरंच या सगळ्यांमधून आजच्या पिढीला यातुन खूप शिकण्यासारखं आहे.
खरंच विषय गंभीर असूनही त्यांच्या संवादातून निर्माण होणाऱ्या विनोदांमुळे वातावरण हलकं फुलकं राहतं.
या तिघांच्याही अभिनया विषयी काय बोलावं.. खरंच..!!! लाजवाब..!!!! 'उमेश कामात' यांना समोर स्टेजवर, Live काम करताना बघणं म्हणजे रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणीच. या आधी या नाटकामध्ये' स्पृहा जोशी' होत्या, पण काही कारणांमुळे त्यांना 'स्वानंदी टिकेकर' यांनी Replace केले. जेव्हा स्पृहा यांनी नाटक सोडणार हे Facebook Live द्वारे सांगितले तेव्हा त्या बोलल्या होत्या कि 'तेवढ्याच ताकतीची अभिनेत्री हा रोल करणार आहे' आणि खरंच!!! स्वानंदी टिकेकर यांनी हि भूमिका खूप मस्त साकारली आहे, खूपच सुंदर अभिनय. आणि आशुतोष गोखले यांनी मित्राची भूमिका खूप छान वटवली आहे.
या नाटकाने ३०० प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. या पुढे या नाटकाचे असंख्य प्रयोग व्हावे आणि हा विषय सर्वांपर्यंत पोहोचावा हीच सदिच्छा.
सर्व रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती हे नाटक नक्की नक्की बघा. आणि हो.. Don't Worry Be Happy....