Saturday 13 August 2022

पत्र

पत्र 


हल्ली मोबाईल,Video Call आणि Chat च्या जमान्यात कोण कोणाला पत्र लिहून पाठवत...? 

नाहीच पाठवत कारण प्रगत तंत्रज्ञान; मनात आलं की आपण आपल्या माणसांशी संपर्क साधू शकतो. 

पण या काळातही जेव्हा आपल्या माणसांचं पत्र आपल्याला मिळत तेव्हा ते वाचतानाची मजा काही औरच असते. 

हल्ली लांब असलेल्या भावाला बहीण राखी पाठवते तेव्हा त्या सोबत चॉकलेट्स, ग्रीटिंग सुद्धा पाठवते. पण माझी आत्ते राख्यांसोबत नेहेमीच एक पत्र लिहून पाठवते. खूप छान वाटतं ते पत्र वाचायला. पूर्वीच्या काळी फोन एवढे नव्हते तेव्हा अशी खुशालीची पत्र पाठवली जायची पण आजही आटते आवर्जून राख्यांसोबत पत्र लिहून पाठवते. 

आता आपल्या मनात आलं की आपण आपल्या माणसांशी बोलू शकतो, कितीही लांब असली तरी Video Call द्वारे पाहू शकतो. पण या पात्रांची मजा वेगळीच आहे. पूर्वीच्या काळी अशी खुशालीची पत्र लिहिली जायची मग त्या पात्राच्या उत्तराची वाट पाहिली जायची. मनातील भावना एका कागदावर उतरायच्या आणि लांब असलेल्या आपल्या माणसांपर्यंत त्या पोहोचायच्या. आपल्या माणसाला पत्र लिहिण्यात आणि त्या पात्राच्या उत्तराची वाट बघण्यात पण एक गम्मत असेल ना..?

आणि हल्लीच्या काळात भांडण कशा वरून होतात तर माझा मेसेज का read नाही केला.. read करून reply का नाही दिला... 

असो... 

तर तुम्ही सुद्धा कधीतरी आपल्या माणसांना अशी पत्र लिहून पाठवा, कागद पेन घ्या आणि लिहा आपल्या मनातील भावना त्यावर आणि पाठवा आपल्या माणसांना. फोन मधले मेसेज कधी ना कधी Delete होतील पण आपल्या माणसांनी पाठवलेली ही पत्र कायम आपल्या सोबत राहतील...❤️