Thursday 16 December 2021

असाही एक प्रवास...

असाही एक प्रवास...  

'असं म्हणतात, प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो'...

पण काही वेळा माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात आणि मग त्याचा प्रवास सुरु होतो 'जुन्यापासून नव्याकडे जाण्याचा'...  


जेव्हा आपल्याला कोणी म्हणतं ना,'अगं तू बदललीचं नाहीस गं', किंवा 'तू अजून आहेस तशीच आहेस गं',

तेव्हा आपण समजावं की आपण अजून आयुष्यात आहोत तिथेच आहोत.   

खरंच..!! माणसाने बदलावं, वेळेनुसार, परिस्थितीनुसार... बदलावं... तिथेच राहू नये. 

नक्कीच हा बदल सकारात्मक असावा. 


जसे आपल्या स्मार्ट फोन मधील Apps वेळेनुसार update होत असतात ना तसंच आपणही वेळेनुसार, परिस्थितीनुसार update व्हावं. 

आपले दोष स्वीकारून ते दोष कसे कमी करता येतील, दोष कसे घालवता येतील यावर काम करावं आणि स्वतःला बदलावं. 


आपल्या नेहेमीच्या वापरातील WhatsApp चं उदाहरण घ्या, आपण ते नेहेमी update नाही केला तर ते आपोआप बंद होत जोवर आपण ते update करत नाही. बंद व्हायच्या १४ दिवस आधी रोज notification येतं. आणि update नाही केला तर ते बंद होत. 

तसंच आपल्या आयुष्याचं असतं आपण स्वतःला आता update करायला हवं अशा notifications आपल्याला मिळत असतात त्या आपण ओळखून स्वतःमध्ये बदल घडवून स्वतःला update केला पाहिजे, नाहीतर आपला टिकाव लागण कठीण. 


Appsचं कशाला आपल्या निसर्गात सुद्धा खूप उत्तम उदाहरण आहे. साप... 

सापाच्या बाह्य पेशी जेव्हा मरू लागतात तेव्हा तो संपूर्ण त्वचा टाकून देतो अर्थातच कात टाकतो. साप जेव्हा कात टाकतो तेव्हा त्याचा पुनर्जन्म झालेला असतो. 

कात टाकत असताना सापाला प्रचंड वेदना होत असतात. त्याचाही हा एक प्रवासच असतो जुन्याकडून नव्याकडे जाण्याचा...  

तसंच आहे हो जुन्यातून नव्याकडे जातानाचा हा प्रवास थोडा वेदनादायी असू शकतो, पण हा प्रवास करा. थांबू नका. 


असा हा जुन्यापासून नव्याकडे जाण्याचा प्रवास प्रत्येकाचा सुरु असतो. कधी कळत, तर कधी नकळत. 




 


 


Friday 22 October 2021

माझी आजी

 

माझी आजी

माझं आणि आजीचं नातं म्हणजे "तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना"....
आता आपलं जमणार नाही आणि आता मला करमणार नाही...😭
मी नेहमी गमतीत म्हणायचे तुझं माझ्यावर प्रेमचं नाही, पण जेव्हा मध्यरात्री माझ्या पायात cramps यायचे तेव्हा लगेच उठून 'ओम नमः शिवाय' म्हणत माझ्या पायाला तेल लावणारी, आणि मी शांत झोपल्यावर झोपणारी तू होतीस... 😭😪
गेले काही दिवस मला बरं नव्हतं म्हणून मी ४..५ दिवस एका खोलीतच होते (Don't worry कोरोना नव्हता) त्यामुळे तुझ्याशी काही बोलणंच झालं नाही, आणि मी बरी झाले तर तू डोळे मिटलेस ते उघडलेच नाहीस... 😭💔
शेवटचं बोलणंच नाही झालं आपलं, हे आता कायम मनात राहील... 💔😣
खरंच आपण आपल्या माणसांना किती गृहीत धरतो, समोर असताना वेळ काढत नाही आणि गेल्यावर दुःख करत बसतो... 🥺😢
काही चुकलं असेल तर माफ कर जिजी...🙏🏼😓

आमच्या घरी आलेलं कोणीही कधी रिकाम्या पोटी गेला नाही; फक्त माणसचं नाही तर दारात आलेली गाय सुद्धा कधी अशीच गेली नाही...
अशीही सगळ्यांचं हसतमुखाने ती स्वागत करणारी, सगळ्यांना प्रेमाने आणि आग्रहाने खाऊ घालणारी माझी आजी... ❤️❤️❤️

ते खरंच बोलतात घरात एक तरी म्हातारं माणूस असावं, आपल्या रूढी-परंपरा शिकवायला, आधीच्या पिढीचे संस्कार पुढच्या पिढीला द्यायला,काही चुकलं तर सांगायला, आपल्यावर प्रेम करायला एक तरी म्हातारं माणूस असावं...❤️❤️❤️

भावपूर्ण श्रद्धांजली... 🙏🏼😞