Sunday, 5 July 2020

Online Mazha Theatre

Online माझा Theatre


Online माझा Theatre
#OMT म्हणजेच Online माझा Theatre...

मराठी रंगभूमीवर होत असलेला एक अनोखा आणि भन्नाट प्रयत्न.

काल म्हणजे ४ जुलै रोजी या #OMT चा पहिला भाग सादर झाला. ज्यामध्ये कोणतेही नाटक, एकांकिका किंवा दीर्घांक  दाखवला गेला नाही तर मराठी रंगभूमीवर काम करणारे अनुभवी तसेच नवोदित कलाकार एका दिलेल्या विषयावर Live परफॉर्म करत आहेत. ते सुद्धा आपापल्या घरातून zoom द्वारे.

ही एक स्पर्धा आहे जी ४ संघांमध्ये लढली जात आहे आणि प्रत्येक संघात ४ स्पर्धक आणि प्रत्येक संघाचे कॅप्टन्स आहेत. आणि या स्पर्धेचे  परीक्षण करण्यासाठी मराठी मनोरंजन क्षेत्रातील ३ दिग्गज कलाकार चंद्रकांत कुलकर्णी, वंदना गुप्ते आणि अश्विनी भावे हे आहेत.

(या स्पर्धेविषयीच्या अधिक माहितीसाठी Online Mazha Theatre - OMT किंवा Wide Wings Media या पेजवर भेट द्या. )

कालचा पहिलाच भाग आणि विषय होता Television. आणि या विषयावर परफॉर्म करण्यासाठी आमने-सामने होते २ संघ 'घेऊन टाक' आणि 'वल्ली's'.

स्पर्धक सादरीकरण करताना
'Television या विषयावर काय बरं परफॉर्म करणार ही मंडळी?'  या विचारात असतानाच सुरवात झाली,
'शुभांकर तावडे' यांच्या दमदार अशा Mime Act ने ज्यात त्यांनी 'Television evolution' दाखवले आणि एका पाठोपाठ एक असे कमाल परफॉर्मन्स यायला सुरवात झाली.
'विकास पाटील' यांनी Television पूर्वीच जीवन आणि Television आल्यावर जीवनात झालेले बदल हे एका कवितेमार्फत सादर केले.
'नंदिता पाटकर' यांनी अभिराम भडकमकर लिखित 'At Any Cost' या पुस्तकातील एक खिळवून ठेवणारा परिच्छेद सादर केला.
'हेमांगी कवी' यांनी पूर्वी Television वर येणाऱ्या 'मुंग्या' ते आता इंस्टाग्राम वर IGTV वर येणाऱ्या मुंग्या अशा या Television वरील मुंग्यांचा प्रवास  खूप अप्रतिमरित्या त्यांच्या खास शैलीत सादर केला.
'भार्गवी चिरमुले' यांनी news channel मध्ये होणारे बदल खूपच सुंदररित्या दाखवले; सुरवातीच्या काळात होणारी पत्रकारिता आणि आता बदलत जाणारी पत्रकारिता यावर भाष्य करणारा हा परफॉर्मन्स ठरला आजचा 'बेस्ट परफॉर्मन्स'.
'आशुतोष गोखले' यांनी एका इंग्रजी कवितेचे मराठीमध्ये अनुवाद करून हल्लीच्या मुलांना कार्टूनचे लागलेले वेड आणि त्यांना कार्टून पाहण्याच्या या वेडा पासून कसं मुक्त करावं यावर भाष्य करणारी कविता खूप सुंदर सादर केली.
'ऋतुराज शिंदे' यांनी एक RAP सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.
आणि या भागाचा शेवट झाला 'नेहा शितोळे'च्या भावनिक पत्राने.

अशा रीतीने  MIME ACT, अभिवाचन, कविता सादरीकरण,RAP, पत्रलेखन अशा सुंदर अशा कलेच्या वेगवेगळ्या पैलूंनी सजलेला पहिला भाग पार पडला, आणि या अनोख्या अशा या अनोख्या प्रयोगात मलाही प्रेक्षक म्हणून सहभागी होता आलं, याचा मला खूप आनंद आहे.

खरं तर 'हा एक नवीन उपक्रम काय आहे पाहूया तर!' असं म्हणत फक्त कालच्या भागाचे मी तिकीट काढले. पण कालचा पहिला भाग इतका कमाल आणि पैसा वसूल होता कि मी लगेच Season Pass काढला. आणि आता पुढच्या भागांसाठी मी उत्सुक आहे. तुम्ही सुद्धा या आगळ्या वेगळ्या प्रयोगाचे भाग होऊ इच्छित असाल तर लगेच तिकीट बुक करा https://www.ticketkhidakee.com/ येथे.

कारण घरात बसलो म्हणून का हो, आडतंय आमचं खेटर...
अभिव्यक्त होण्यासाठी आता 'Online माझं Theatre'

खूप खूप धन्यवाद...!! Subak आणि Wide Wings Media

No comments:

Post a comment