Saturday 6 May 2017

...स्मृती ठेवून जाती

चला.... College Life संपली....आता जबाबदारीच्या जगात जायची वेळ आली.....

आयुष्यातल्या खुप सुंदर अशा पर्वाचा मी निरोप घेतला. निरोप घेण ही एक नाजूक आणि हृदयस्पर्शी अवस्था आहे. सुख आणि दुःख यांच्यातल्या सीमारेषेवरची ही अवस्था प्रत्येक व्यक्तीच्या वाटल्या कोणत्या ना कोणत्या तरी संदर्भात अटळपणे सामोरी येते. म्हणूनच या क्षणी हा निरोप घेताना मनात खुप संमिश्र अशा भावना आहेत. मनाची चलबिचल चालू आहे. जवळच्या व्यक्ति आता नेहेमी भेटनार नाहीत याच दुःख ही आहे, तसेच आता नविन पर्वाला सुरवात होणार, नविन माणसं, नविन आव्हानं या बाबत उत्सुकता देखील आहे. नविन शिकायला मिळणार याचा आनंद देखील आहे.

खरी College Life मी अनुभवली ती म्हणजे B.Sc. IT च्या त्या तीन वर्षाच्या प्रवासात. खर तर त्या तीन वर्षांविषयी कमी शब्दात मांडण तस कठीणच आहे.  ती तीन वर्ष म्हणजे माझ्या आयुष्यातली खूप सुंदर तीन वर्ष होती. अभ्यासाची तर जबाबदारी होतीच; पण आयुष्य उपभोगणे म्हणजे काय, याचा अर्थ कळू लागला होता. खर तर तो सुंदर स्वप्न बघण्याचा काळ होता. ती तीन वर्षे हसत खेळत सुंदर स्वप्ने बघण्यात पार पडली. मैत्रीचे घट्ट धरलेले हात कधीच सोडायचे नाहीत, असे ठरलेले असताना पुढच्या वाटा अचानक वेगळ्या झाल्या. पण आजही त्या जुन्या आठवणी मनात ताज्या आहेत; रविना, अंतरा, अमृता, भूपाली, अपर्णा, दिबा, राहुल, अजिंक्य, सागर यांच्या बरोबर केलेली मज्जा, एकमेकांची टिंगल, त्या रंगलेल्या गप्पांच्या मैफिली; राहुल, अजिंक्य आणि सागर यांनी मला दिलेला त्रास आणि बराच काही.... या सगळ्या गोड आठवणी आठवल्या कि अलगद चेहेर्यावर हसू येत. प्रेमासह तारुण्याच्या सर्व व्याख्या जाणून घेत झालेला हा प्रवास संपवून आम्ही सर्व पुढच्या प्रवासाला निघालो.        
           
पुढे मी MBA ला admission घेतल. आजही मला तो admission चा दिवस आठवतोय. खरंतर मनात नसताना मी MBA ला admission घेतल आणि सुरु झाला हा २ वर्षाचा प्रवास. या दोन वर्षात खुप चांगले वाईट अनुभव आले. नविन गोष्टी शिकता आल्या. खरं तर म्हणव तस मनासारखं काही घडल नाही या २ वर्षात. पण ३ व्यक्ति अशा आहेत ज्यांना मी कधीच विसरणार नाही. खरंतर या तीन व्यक्तींमुळे माझा MBA चा प्रवास खुप छान झाला...

त्यातली पहिली महत्वाची व्यक्ति म्हणजे "हिमा"
माझी खुप जवळची मैत्रीण, जिच्याशी मी मनातल सर्व काही बोलू शकते. खुप हुशार, समजूदार, प्रेमळ, समजून घेणारी, समजावून सांगणारी अशी हि मैत्रीण. हिमा माझ्यापेक्षा मोठी असल्याने ती कधी मला मोठ्या बहिणीच्या अधिकाराने रागवायची तर कधी समजावून सांगायची.  तिच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. आमच्या गप्पा म्हणजे कधीही न संपणाऱ्या. खरंच हिमा खूपच miss करीन मी तुला.      


दूसरी व्यक्ति म्हणजे "मरियम मॅम"
Classroom मधे teacher असलेल्या मरियम मॅम सुद्धा मला एका मैत्रिणी सारख्याच वाटतात. खुप साध्या, सरळ, कायम हसमुख असणाऱ्या आमच्या या मैडम ज्यांच्याशी आम्ही एक मैत्रीप्रमाणेच सर्व काही share करत असे. हिमा आणि मॅम बरोबरच gossiping म्हणजे तर खुपच मज्जा....

तीसरी महत्वाची व्यक्ति म्हणजे "श्रीनिवास गोखले सर"
त्यांच्या विषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच. त्यांच्या प्रत्येक lecture नंतर अस वाटायच की "बापरे!किती knowledge आहे सरांना, आम्हाला तर यातल 2% पण knowledge नाही". खरंच, जेव्हा सर join झाले तेव्हा अस अजिबात वाटल नव्हतं की सरांबरोबर एवढं चांगल पटेल. खुप strict असे दिसणारे पण खुप चांगले असणारे हे सर. सरांना कोणताही प्रश्न विचारा त्यावर सरांकडे उत्तर नाही असं कधीच झालं नाही.रंतर खुप त्रास दिला मी त्यांना, पण तरीही कायम मार्गदर्शन केलं. कधीही काही problem आला तरी कायम मार्ग दाखवणारे, समजावून सांगणारे असे हे सर.

खरचं खुप मनापासून धन्यवाद तुम्हा तिघांना....

तसंही आपली इच्छा असो वा नसो आयुष्य आपल्याला वेगवेगळ्या वळणांवर आणून उभे करतो. आपण कधी विचारही केलेला नसतो, अशा ठिकाणी आपण जाऊन पोहोचतो. त्या त्या ठिकाणी स्वतःला रमवणे आणि आनंदी राहणे एवढच आपल्या हातात असत.
या कॉलेजच्या विश्वानंतर आता नोकरी, व्यवसाय, उच्चशिक्षण अशा अनेक कारणांनी नविन शहरात जाणे होईल, नविन माणसं भेटतील, पण तिथेही कधीतरी निरोपाची वेळ येईलच. कारण आयुष्यात पुढे जाताना काही मागे टाकले जाणारच. निरोप घेऊन माणसे दूर जातात, दृष्टीआड होतात पण त्यांच्या आठवणी मात्र मनातून जात नाहीत.

म्हणूनच म्हणावस वाटत “खरचं! गेले ते दिवस राहिल्या त्या फ़क्त आठवणी....

10 comments:

  1. Awesome Richu....Loved it ����������✌❤

    ReplyDelete
  2. Thanks for the kind words Richa! Wish you the very best!

    ReplyDelete
  3. खूप छान!!

    प्रत्येकाच्या मनात असाच काहीसं असतं, कोणी ते व्यक्त करत तर कोणी मनातच तेवत 👍👍

    ReplyDelete