Monday 4 June 2018

'संगीत देवबाभळी'
एक विठुसावळी नाट्यकृती....




आज सावित्रीबाई फुले कलामंदिर, डोंबिवली येथे 'संगीत देवबाभळी' हि नाट्यकृती अनुभवली.
हो! नाट्यकृती पहिली नाही तर अनुभवली...


या नाटकाच्या Social Media प्रसिद्धी टीम मध्ये असल्याने सुरवातीपासूनच मी सुद्धा या नाटकाचा एक भाग आहे, त्यामुळे या नाटकाविषयी खूप ऐकलं होते, वाचले होते पण पाहण्याचा योग येत नव्हता. पण आज प्रेक्षक म्हणून या नाटकाचा भाग होता आलं.
आणि आज जवळ जवळ १२ वर्षानंतर नाटक फक्त पाहायला नाही तर अनुभवायला मिळालं.

या दोन अंकी नाटकात फक्त दोनच पात्रे आहेत - संत तुकारामांची बायको 'आवली' आणि 'लखुबाई' उर्फ 'रखुमाई'. शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी यांनी या भूमिका खूप सुंदररित्या साकारल्या आहेत. दोघीनींही खूप सुंदर अभिनय केला आहे आणि खूप गोड आवाज आहे दोघींचाहि. त्या दोघी Live गाणं गात आहेत असं वाटतचं नाही. असं वाटतं की recorded आहे.
तसेच, सुरवातीला कजाग वाटणारी आवली, नाटकाच्या शेवटाकडे येताना, ती तिच्या जागी बरोबरही वाटते.
रखुमाईच्या मनाची अवस्था पाहून वाटले की नशिबाचे भोग देवालाही चुकले नाही.

तसे संपूर्ण नाटकांचे प्रकाश आणि ध्वनी संयोजन खूप अप्रतिम आहे; तरी इंद्रायणी काठ दाखविण्यासाठी केलेली रचना, पावसाळी वातावरण दाखविणारा निळा गर्द प्रकाश आणि ध्वनी संयोजन मला खूप भावले.

हे नाटक लिहिणारे आणि दिग्दर्शित करणारे 'प्राजक्त देशमुख' यांनी शब्दांची सुंदर किमया या नाटकात साधली आहे. संगीत नाटकं असलं तरी काही संवादातून निर्माण होणाऱ्या विनोदांमुळे (खरं विनोद असं नाही म्हणता येणार) वातावरण हलकं फुलकं राहत.

अजून एक विशेष बाब म्हणजे या संगीत नाटकाला तरुण वर्ग सुद्धा मोठया संख्येने उपस्थिती लावतं आहे.

खरंच!!! हा एक नाट्यानुभव आहे... खरं या नाटकाविषयी खूप लिहायचं होत पण शब्द सुचतं नाही आहेत.... 
तुम्ही सुद्धा हि 'भद्रकाली प्रॉडक्शन' ची ५५वी विठूसावळी नाट्यकृती 'संगीत देवबाभळी' नक्की अनुभवा...

2 comments: