Thursday 15 August 2019


स्वातंत्र्यातील  बंधन 

या वर्षीचा एक सुंदर योगायोग म्हणजे,  एकीकडे देशाचा स्वतंत्र दिन साजरा करायचा आहे तर एकीकडे गोड असं बंधन आहे 'रक्षाबंधन'... 

'रक्षाबंधन' म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून भाऊ आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो. किंवा आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे.


पण आताच्या काळात मुलींना आता फक्त समाजात वावरतानाच नाही तर Social Media वर सुद्धा सुरक्षिततेची, रक्षणाची गरज भासू लागली आहे. त्याच कारण असं, कि हल्ली Social Media वरून मुलींचे फोटो घेऊन ते अश्लील मेसेज सह किंवा खूप वाईट पद्धतीने Edit करून Viral केले जात आहेत. तिला बदनाम केलं जातं आहे. आणि हो, हे Viral होणारे फोटो कमी कपड्यातले असतातच असं नाही हा. काय आहे ना हल्ली मुलींच्या कपड्यांवरून खूप चर्चा केली जाते ना.. Viral होणारे बरेच फोटो हे पूर्ण कपड्यातले, साडी मधले, simple असेही असतात.  म्हणजे इथे प्रश्न फक्त मुलींच्या कपड्यांचा नाही तर तो बघणार्यांच्या दृष्टिकोनाचा, त्या विकृतीचा आहे.   

पण, काही झालं तरी बंधनं मुलींवरच येतात. मुलींनी असं वागू नये, तसं करू नये. Social Media हे टाकू नको, स्वतःचा फोटो नको टाकू. म्हणजे मुलींनी कायम बंधनातच राहायचं का? मग ते समाजात असो किंवा Social Media वर. या मध्ये मुलींची काय चूक? की ती मुलगी आहे ही तिची चूक? 
या Cyber Crime मध्ये जर कोणाची चूक असेल तर ती त्या वृत्तीची आहे. आणि महत्वाचे म्हणजे हि विकृती फक्त मुलांमध्येच आहे असं नाही; तर काही वेळा असं करणारी एक मुलगीही असू शकते हे खूप दुर्दैवी आहे.  

असे गुन्हे पकडले जातात, जेल पण होते, मग जामीन होते आणि पुढे केस चालूच राहते. Social Media वर सुद्धा काही Security Features आहेत तरीही असे गुन्हे घडतात आणि घडत राहतील. मग मुलींनी करायचे काय? 

त्यामुळे समाजात वावरताना कदाचित तुम्ही एका मुलीचं रक्षण करालही पण Social Mediaचं काय? 

अशा वेळी तिला रक्षणाची नाही तर तुमच्या पाठिंब्याची गरज असते. तिच्यावर बंधन घालण्यापेक्षा तिला फक्त म्हणा, 'तुझी काही चूक नाही, आम्ही आहोत तुझ्या बरोबर'.     

मी असं म्हणतं नाही कि प्रत्येक वेळी मुली १००% बरोबर आहेत, काही ठिकाणी त्यांची हि चूक असू शकेल. पण तिची अशी बदमानी नको.  

या स्वातंत्र्यामध्ये तिच्यावरचं बंधनं नको.  तर या वाईट वृत्तीवर, या विकृतीवर बंधन येवो हीच प्रार्थना...  

जय हिंद!!! 


8 comments: