Saturday 22 July 2017

यंदा खरंच कर्तव्य आहे...?



साधारणपणे आपल्याकडे मुलीचं Graduation झालं की, आजूबाजूचे, नातेवाईक मुलीच्या आई-वडिलांना विचारायला सुरवात करतात, “काय मग यंदा कर्तव्य आहे का?” किंवा “काय मग मुलगा बघायला कधी सुरु करताय?” नाहीतर मग स्थळच आणायला सुरवात करतात.

पण एकंदर विचार करता “खरंच! लग्नासाठी मुलीचं किंवा मुलाचं “वय” हा एकच निकष आहे का?” हे खरं आहे की ‘सगळं योग्य वयातच झालं पाहिजे’, आपले घरातले मोठे, जाणती माणसे सुद्धा हे बोलतात त्यात तथ्य आहे.

तरीही मला असं वाटत की फक्त मुलीचं किंवा मुलाचं लग्नाचं वय झालं म्हणून त्यांच्या लग्नासाठी पाठी लागू नये. लग्न म्हणजे आयुष्यभराची commitment असते त्यामुळे तो निर्णय खूप विचार करून घेतला पाहिजे. हा निर्णय घेण्यापूर्वी आपण ‘खरंच लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या निभावू शकतो का?’, ‘तडजोड करू शकतो का?’, ‘आयुष्यात येणारा बदल पूर्णपणे स्वीकारू शकतो का?’, ‘हे नात पूर्णपणे निभावायला आपण तयार आहोत का?’  ‘आपल्या जोडीदाराला समजून घेऊ शकतो का?’, ‘मुलगी असेल तर फक्त जोडीदारालाच नाही तर त्याच्या घरच्यांना समजून घेऊ शकतो का?’ हे आणि असे बरेच प्रश्न  स्वतःला विचारले पाहिजेत. फक्त लग्नाचं वय झालं म्हणून लग्न करण्याचा निर्णय घेऊ नये.

तसं बघयला गेलं तर आजच्या Career Oriented  जगात मुली साधारण २५-२६ नंतर लग्न करतात. काही वेळा Career मुळे लग्नाचा विचार मागे पडतो. काहींना Career ऐन उमेदीच्या काळात लग्नाच्या बंधनात अडकण्याची इच्छा नसते, तरीही मग घरच्यांच्या आग्रहाखातर लग्नाला ‘हो’ म्हणतात. पण ‘हो’ म्हणण्या आधी स्वतःला हे प्रश्न जरूर विचारले पाहिजे आणि तशी मनाची तयारी सुद्धा केली पाहिजे. कारण आज-काल Career मुळे, पैसे कमवण्यामध्ये आपल्या आयुष्यात खूप stress असतो. आणि हा कामाच्या ठिकाणचा stress घरी निघतो आणि मग भांडण आणि बरंच काही. त्यामुळे जर हा stress सांभाळून हे नवीन नात निभावण्याची तुमची मनाची तयारी असेल तरचं म्हणा “हो! यंदा कर्तव्य आहे.”                                         




1 comment: